नको करू Submitted by शिवाजी उमाजी on 12 July, 2017 - 07:24 नको करू (अष्टक्षरी) काजळ रेषा काढता नेत्र बाण तो सुटतो माळू नको तू गजरा मीच मोहरून जातो नको ते केस मोकळे जीवाचा या गुंता होतो ओष्ठशलाका लावते? रक्तीमा गालास येतो ओठा स्पर्ष अधराचा कलेजा खलास होतो © शिवाजी सांगळे, मो. +91 9545976589 विषय: काव्यलेखनशब्दखुणा: करू नको