डायरीतल्या कविता ...

सांजमळवट

Submitted by भुईकमळ on 16 March, 2017 - 10:55

बोलावतो घंटारव
धुकाळल्या घाटावर
बेडी काचते श्वासांची
नादहाका देहभर ...

पूर येई कहाणीला
अश्रू सांडता नदीत .
घट चालला वाहून
माझा स्पर्श सांभाळीत ...

तहानेच्या वादळात
आर्त वृक्षाचे आर्जव ,
'येग येग मेघावली
विडा वीजेचा भरव ".

जाओ नभापार झोका
रुपु देत चंद्रकाचा
तुटणाऱया तारकांचा
उरी प्राणांतिक ठेका ...

आता रानोमाळ गाते
सावलीला झुगारून .
रक्तशिंपण करते
पांगाऱ्याच्या फांद्यातुन

Subscribe to RSS - डायरीतल्या कविता  ...