मना कर मनोहर शोधाया अभ्यास

आहे मनोहर तरी...!

Submitted by चैतन्य दीक्षित on 2 February, 2017 - 04:38

आहे मनोहर तरी गमते उदास ।
मनाला या पूर्णातल्या अपूर्णाची आस ।।

हासुनिया बोले कुणी, हासुनी उत्तरी ।
तरी घेई शंका हेतूबद्दल अंतरी ।
स्वतःच्याच पायामध्ये स्वत:चाच फास ।। १ ।।

पूर्णचंद्र पौर्णिमेचा मनाला मोहवी ।
तेच मन चंद्राचे का कलंक दाखवी?
कुणीच ना बांधू शके मनाचा कयास ।। २।।

कसे असायला हवे? आणि कसे नाही?
याची चिंता उगी सदा करीत ते राही।
असण्याची अनुभूति राहते दूरास ।। ३ ।।

शोधू जाता मनोहर, तेच सापडेल ।
अपूर्णाला गोंजारता मन अडकेल ।
मना, कर मनोहर शोधाया अभ्यास ।।४ ।।

~चैतन्य

Subscribe to RSS - मना कर मनोहर शोधाया अभ्यास