बबिता फोगट

दंगलच्या निमित्ताने - चित्रपटात दाखवली जाणारी भ्रष्ट सरकारी यंत्रणा !

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2017 - 03:36

चित्रपटात भ्रष्ट सरकारी यंत्रणा आणि उदासीन किंवा माज आलेले सरकारी अधिकारी दाखवले जाणे काही नवीन नाही. विविधतेने नटलेल्या भारताची कित्येक रुपे आहेत आणि त्यातील जे रूप पडद्यावर दाखवायचे आहे ते साकारायचा पुर्ण अधिकार एखाद्या दिग्दर्शकाला आहे. पण तेच एखादा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत असतो तेव्हा मात्र संबंधित व्यक्तींबद्दल चुकीचे चित्रण करणे अयोग्य आहे असे मला वाटते. मुख्यत्वे अश्या चित्रपटातून भारताची काय इमेज आपण जगासमोर ठेवतो आहे याचे भान जरूर पाहिजे. चित्रपटाचे बॅनर जेवढे मोठे तेवढे हे भान अधिक ठेवायला हवे. कारण अश्यावेळी चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - बबिता फोगट