बंदुक

एका ढिश्क्यांव.... रोचक इतिहास बंदुकीचा.

Submitted by सोन्याबापू on 23 September, 2016 - 20:38

माणूस हा प्राणी उत्क्रांतीच्या प्रवासात तसे पाहता शारीरिकदृष्ट्या एक अशक्त जीव आहे असे वाटते. त्याच्याकडे ना मोठी नखे आहेत, ना लांब सुळे, ना वेगात पळायला सक्षम स्नायू, ना प्रचंड मोठा आकार, ना थंडी-पाण्यापासून बचावासाठी जाड फर किंवा कातडी. एकच असा अवयव आहे, जो उत्क्रांतीच्या ह्या प्रवासात त्याला इतर प्राण्यांपेक्षा पुढे नेऊन ठेवतो, तो म्हणजे शरीराच्या मानाने मोठा असलेला मेंदू अन त्याने बहाल केलेली बुद्धिमत्ता. आदिमकाळी विकास सुरू झाला, तेव्हा मानव हा नुसता दुबळाच नाही, तर बर्‍याच वेळा इतर बलवान मांसाहारी प्राण्यांची शिकारसुद्धा असे.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - बंदुक