संगीतक हे नवे मायबोली गणेशोत्सव २०१६

संगीतक हे नवे-मी टिळकांशी बोलते

Submitted by आशिका on 11 September, 2016 - 07:16

मी टिळकांशी बोलते

निघाले आज लेकासवे
सार्वजनिक गणपती त्या दाखवावे

होता भव्य मंडप दिमाखदार
रांगही होती अपरंपार

आलो एक फेरी मारुन
ओळखीचे कुणी दिसते का म्हणून

शॉर्टकट मारायची सवय बापडी
नसांनसांत आहेच भिनली

एकदाचे शेवटी आत पोहोचलो
देखावा पाहून स्तिमित झालो

टिळकांचा तिथेच पुतळा भारी
खुणावू लागला मला दुरुनी

गेले तडक लाईन मोडून
'लोकमान्यांची' हाक ऐकून

जवळ जाताच भांबावले नेत्र
टिळकांचा आवेश दिसत नव्हता मात्र

स्वराज्याचा हक्क सांगणारी तर्जनी
भासली म्लान, खाली होती झुकली

नाराज का दिसे टिळकांची स्वारी?
रुचत नाही का उत्सवाची परी?

विषय: 
Subscribe to RSS - संगीतक हे नवे मायबोली गणेशोत्सव २०१६