ह्याच कारणामुळे मानतो तुझ्याहून मी सफल मला

ह्याच कारणामुळे मानतो तुझ्याहून मी सफल मला

Submitted by बेफ़िकीर on 2 August, 2016 - 11:17

ह्याच कारणामुळे मानतो तुझ्याहून मी सफल मला
जशी तुझी घेतेस, न घ्यावी लागे माझी दखल मला

माझ्या गझलेमध्ये आता येतच नाही तुझा विषय
गोष्ट वेगळी की आताशा जमतच नाही गझल मला

लोक उगाचच वेगवेगळी स्थळे बघत बसतात इथे
तू असल्याने अख्खे जीवन वाटत आहे सहल मला

"नको मला भेटूस असे कुठल्या भेटीमध्ये सांगू?"
मजेशीर वाटत होती ती तुझी खुळी चलबिचल मला

बाकी जग का होते ह्यावर प्रदीर्घ संशोधन केले
मी येथे का होतो ह्याची कधी व्हायची उकल मला

ह्यापेक्षा कोणी दुर्दैवी असले तर कळवा बर का
मला पाहुनी उमलत जी, ती फुले म्हणाली "उमल" मला

ऋतू आणले, कळ्या आणल्या, नाही नाही ते केले

Subscribe to RSS - ह्याच कारणामुळे मानतो तुझ्याहून मी सफल मला