स्फुत १३ - चुकून पुरुषांच्या डब्यात

स्फुट १३ - चुकून पुरुषांच्या डब्यात

Submitted by बेफ़िकीर on 13 June, 2016 - 10:55

चुकून पुरुषांच्या डब्यात
'तरी का होईनात'
शिरू शकलेल्या
बाईसारखा जन्म!

काय सांभाळावे
नसलेले पैसे
कवितेचे दागिने
की तिथल्या सगळ्यांसारखेच असलेले अवयव

चुकून बायकांच्या डब्यास
'कसे का होईनात'
लटकलेल्या पुरुषाचे
प्राक्तन

कसले पुरावे द्यावेत
अनभिज्ञतेचे
लिंगाच्या एकपत्नीव्रताचे
की समानतेच्या एक्स्टेंडेड अर्थाचे

आयुष्याची 'लोकल' थांबेल
तेव्हा मला अटकही होईल
आणि माझी सुटकाही

स्टेशनचे नांव असेल मृत्यू

तेव्हा पुरुषांचा आणि बायकांचा
दोन्ही डबे शपथेवर सांगतील
हा नीट वागला

पण हे कोणीही सांगणार नाही

की

कधी ना कधी
आमच्यातला प्रत्येकजण

Subscribe to RSS - स्फुत १३ - चुकून पुरुषांच्या डब्यात