त्रिवार

त्रिवार नमस्कार - माझी एक कविता...

Submitted by पांथस्थ on 7 May, 2016 - 10:37

रोज रोज नवे घोटाळे आणि भ्रष्टाचार,
वाढतच जाताहेत अन्याय आणि अत्याचार!
बळावत चाललेले अनेकविध विकार,
धर्मांध शक्तीचे विषारी फुत्कार!
दुर्जनांचे होताहेत सगळीकडे सत्कार,
सज्जनांना मिळतो मात्र सर्वत्रच नकार!
अशाही परिस्थितीचा करून नाईलाजाने स्वीकार,
जगण्याच्या लढाईत जो मानत नाही हार!
हिरावले गेलेत ज्याचे बहुतेक सारे अधिकार,
उरला ज्याला आता फक्त ‘कार्डात’ च ‘आधार’!
आशा बाळगून आहे जो, कि घडेल पुन्हा ‘चमत्कार’
येईल उध्धरण्या कोणी मसीहा घेऊन नवा ‘अवतार’!
अशा ‘सामान्य’ माणसाला माझा ‘त्रिवार नमस्कार’ !!!

Subscribe to RSS - त्रिवार