स्फुट १० - तेवढी मजेत घालवूयात ना?

स्फुट १० - तेवढी मजेत घालवूयात ना?

Submitted by बेफ़िकीर on 24 April, 2016 - 03:17

धावपळ करू नका
घरातल्या कामांचे
टेन्शन घेऊ नका
टेन्शन देऊ नका
व्हायचे तसे होईल
घर म्हणजे ऑफीस नव्हे
ही कामे करण्याचे आता तुमचे वय नाही
टीव्ही बघा, वाचन करा, गप्पा मारा
आपण भरपूर गप्पा मारू
मी तुम्हाला सगळं सगळं सांगतो
फिरायला जात जा सोसायटीत
मस्त खा, प्या
ही बाई आज आली नाही
रद्दी साठलीय
बिलाची आज शेवटची तारीख आहे
हे फ्रीजमध्ये काय ठेवलंय
घड्याळ का बंद पडलंय
हे सगळं बघायचे
तुमचे वय नाही
तुम्हाला सर्व प्रकारचा आराम मिळावा
ह्यासाठी सर्व प्रकारच्या यंत्रणा
अस्तित्त्वात आणलेल्या आहेत
त्यांचा विनियोग करा
हसा, आनंदी राहा
सारखे तणावग्रस्त राहू नका

विषय: 
Subscribe to RSS - स्फुट १० - तेवढी मजेत घालवूयात ना?