कवीचा टाहो

जागतिक कवी दिन - कवीची कैफियत

Submitted by घायल on 21 March, 2016 - 01:02

मी पाहिली आहे सोसेनाशी (सोशल मीडियावर)
एका कवीची भीषण उपेक्षा
कवयित्रीला रिप्लाय लाडीक
कवीला नसते खारीक बारीक

अघोरी गप्पा मैलामंडळाच्या
कवयित्रीच्या कवितांवर चाली
यमक जुळवा, अथवा तुडवा
कच्छचे रण कवीच्या भाळी

दु:खात भर आणि तेव्हां पडते
जेव्हां कवयित्री सुंदर असते
गद्य जरी लिहीले तिने
ते महान एक काव्य ठरते

मी कवी एक फाटका तुटका
झोळी घेऊन उन्हात फिरतो
सावलीतले प्रतिसाद लाडे
घामात निथळत वाचत बसतो

कवी दिनाचे निमित्ताने तुमची
गचांडी धरतो रिप्लायसाठी
विनोद समजून सोडून द्यावा
टाळी द्या एक कवितेसाठी

कवी - उद्ध्वस्त कपोचे

Subscribe to RSS - कवीचा टाहो