लोचट

लोचट सावली

Submitted by pkarandikar50 on 9 February, 2016 - 02:26

लोचट सावली

विस्मरणाच्या खाईत विसर्जित केलेली,
एकेका आठवणीची एकेक लोचट सावली.

दूर लोटली,बळेच ढकलली, हाकलली.
तरी तिची निगरगट्ट सवय नाही सुटली.

एखाद्या कोपर्‍यावर परिचित,
ऊपटतेच अनाहूत अवचित.

एखाद्या गाफिल वळणावर
बसते, दबा धरून,श्वास रोखून.

आणि गोचिडासारखी चिकटतेच
पुन:पुन्हा येऊन.

शेवटी सावलीच ती, तिचे काय चुकले?
प्रसन्गावधान तिला कधी कुणी शिकवले?

रोमांच किंवा हुरहूर, तिला काय माहीत?
कसे व्हावे तिने तरी, व्याकूळ किंवा पुलकीत?

बापू.

शब्दखुणा: 

लोचट सावली

Submitted by pkarandikar50 on 9 February, 2016 - 02:26

लोचट सावली

विस्मरणाच्या खाईत विसर्जित केलेली,
एकेका आठवणीची एकेक लोचट सावली.

दूर लोटली,बळेच ढकलली, हाकलली.
तरी तिची निगरगट्ट सवय नाही सुटली.

एखाद्या कोपर्‍यावर परिचित,
ऊपटतेच अनाहूत अवचित.

एखाद्या गाफिल वळणावर
बसते, दबा धरून,श्वास रोखून.

आणि गोचिडासारखी चिकटतेच
पुन:पुन्हा येऊन.

शेवटी सावलीच ती, तिचे काय चुकले?
प्रसन्गावधान तिला कधी कुणी शिकवले?

रोमांच किंवा हुरहूर, तिला काय माहीत?
कसे व्हावे तिने तरी, व्याकूळ किंवा पुलकीत?

बापू.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - लोचट