cigarette

'शिग्रेट'!

Submitted by जव्हेरगंज on 16 December, 2015 - 00:11

'शिग्रेट'! शिग्रेट लागती काकाला.
मला दोन रुपय दिलं आन मनालं
"जांब्या, जारं बिस्टाल घीऊनं यं"
बिस्टाल दिड रुपायाची आन आठाण्याचं चाकलेट मला.
सुरकीच्या दुकानातनं म्या बिस्टाल घीतली आन एक काफी चाकलेट. लय गॉड आसतं. मज्जा. चिमणीच्या दातानं तायडीला ऊल्स. बाकी समदं मला.
पण हातात बिस्टाल. लय पांढरी, मागं मऊ मऊ गादी. घातली तोंडात. आहा! मज्जा! दोन झुरकं बी घेतलं. खोटंखोटं. चुटकी वाजवून राख पण झाडली. आहा! मज्जा!
मग काका दिसला. शिग्रेट दिली. त्यानं तोंडात घालून काडी वढली.
"तोंडात घालून आणली कारं?"
"न्हाय बी"
मग हातात घीऊन त्यानं बघीतली

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - cigarette