फार सच्ची माणसे जोडू नका

फार सच्ची माणसे जोडू नका

Submitted by बेफ़िकीर on 14 June, 2015 - 11:59

फार सच्ची माणसे जोडू नका
जोडली गेलीच तर तोडू नका

बेधडक जा आत भक्ष्यासारखे
कोणताही सापळा सोडू नका

फारसे नावीन्य नसते त्यामधे
आपली गुपिते कधी फोडू नका

तीच का सुचली असावी हे बघा
ओळ वेड्यासारखी खोडू नका

माणशी एकच दिले जाते इथे
मन कुणाचेही कधी मोडू नका

-'बेफिकीर'!

Subscribe to RSS - फार सच्ची माणसे जोडू नका