गझल पावसाळी ...
Submitted by बाळ पाटील on 13 June, 2015 - 01:28
ओढून चाप जातो पावसाळा
मारून थाप जातो पावसाळा
धुंदी कशाकशाची ही जगाला
काढून माप जातो पावसाळा
या श्रावणी तिलाही झोप नाही
देऊन ताप जातो पावसाळा
अन्नास जागतो का आज कोणी ?
पेरून शाप जातो पावसाळा
गाठीस कोणते हे पुण्य होते ?
फेडून पाप जातो पावसाळा
आहे तुला मलाही कोण वाली ?
होवून बाप जातो पावसाळा
-- बाळ पाटील
विषय:
शब्दखुणा: