उगाचच एकमेकांचे कपल ठरणे अधेमध्ये
Submitted by बेफ़िकीर on 20 May, 2015 - 13:07
उगाचच एकमेकांचे कपल ठरणे अधेमध्ये
किती डसते तुझी माझी सहल ठरणे अधेमध्ये
तुझ्यावाचून जगताना किती सातत्य दाखवले
कसे मंजूर व्हावे.. 'मी सफल ठरणे'.... अधेमध्ये
नसावा हा जमाना तो जिथे ते लोक होते जे
कधीकाळी बदलणे हा बदल ठरणे अधेमध्ये
सदा ह्या उत्तरांना येत पारंब्या सवालांच्या
चुकुन कोडीच कोड्यांची उकल ठरणे......अधेमध्ये
कवी नसतोच मी तर मग तुला जमले कसे असते
सदोदित गद्य असताना गझल ठरणे अधेमध्ये
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा: