पुण्याच्या संशोधकांचे सर्वेक्षण

वरदा यांनी परिश्रमपूर्वक केलेल्या संशोधन कार्याची माहिती

Submitted by किंकर on 10 May, 2015 - 17:50

वाळवा तालुक्‍याला चार हजार वर्षांचा वारसा!
अशी बातमी दिनांक १०मे २०१५ रोजी सकाळ मध्ये प्रकाशित झाली आहे. माझा जन्म वाळवा तालुक्यातील 'बहे' या गावी झाला असल्याने व माझे बालपण उरुण - इस्लामपूर येथे गेले असल्याने सदर बातमी मी थोडी उत्सुकतेने वाचली . माझ्या जन्म गावाबाबत एकूण दोन दंत कथा प्रसिद्ध आहेत .
बहे या गावी इस्लामपूर येथून जाण्याचा जो मार्ग आहे त्यावर बहे हे गाव येण्यापूर्वी अगोदर एक टेकडी लागते. त्या टेकडीस 'तुकाई' ची टेकडी असे म्हणतात .
प्रभू रामचंद्र जेंव्हा वनवासात दंडकारण्यात प्रवास करीत होते तेंव्हा राम आता आपल्याला विसरला तर नाही ना ! अशी शंका रामाच्या मातेच्या मनात आली.

विषय: 
Subscribe to RSS - पुण्याच्या संशोधकांचे सर्वेक्षण