संध्याछाया

संध्याछाया...

Submitted by अत्रुप्त आत्मा on 6 April, 2015 - 10:08

दिवस संपला होता होता झालि संध्याकाळं
संध्येच्या त्या छायेमध्ये झोपे थकला बाळं

वाट वाकडी करून दिसाला संध्या छाया आली
बाळाच्या त्या चर्येवरती मावळणारि लाली

तो ही थकला ती ही थकली सांज वातीला जागा
उद्या पुन्हाही सकाळ होइल तोवरि कसला त्रागा?

मी ही वदतो छोटी कहाणी प्रत्येका दिवसाची
कुठे कुठे ती दिसे पौर्णिमा-बाकी ही अवसेची!

चला गड्यांनो समजुन घेऊ रूपक हे संध्येचे
जुने जाणते जे जगले ते साधे जीवन साचे
-----------------------------
अतृप्त..

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - संध्याछाया