ऋतूकविता

शीळ रानात घुमली

Submitted by भुईकमळ on 21 March, 2015 - 09:52

शीळ रानात घुमली ,नवी पालवी लाजली
स्वप्नं झुलली गोमटी ,आमराई गर्भारली ∥धृ∥

वज्रटीक करवंदी ,ठुली टेकडी ल्यायली .
तिज घालुन गिरकी, वाट छोटुली निघाली
.रानमोगरीने जिथे जळी रांगोळी घातली ∥१∥

सोनमोहराच्या तळी सोनदुपार निजली
जाग जांभळी फुलांची कांचनात उमलली
मुंडावळी बहाव्यास , अंगा हळद लागली ∥२∥

रंगारी या पळसाने चुनरिया रंगवली
सृष्टीकाया मस्तानीची छंद केसरिया ल्याली
शीळ मोहास भुलली मधुमिठीत फसली ∥३∥

कशी काटेरी शापाला फुले माणकांची आली
पांगारयाची फांदी फांदी गावे पाखरांची झाली
चंचू रुतली मातली उरुसात दंग झाली

Subscribe to RSS - ऋतूकविता