मदांध

मदांध ..

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 13 March, 2015 - 13:56

ते येतात..
दाखवतात
सुजलेली तोंड
वाढलेली पोट
आणि त्यांची
अक्कल
बरबटलेली स्वार्थात
मिजास
पोसलेली मदात

ते येतात...
गर्दी घोळक्यात
जी असते
त्यांच्याहून भोंगळ
सडकछाप
आणि मिरवतात
लाज नसलेल्या
वेश्येगत
प्रदर्शन करत
स्वत:च्या टीचभर
साम्राज्याचे
उगाच भुंकत

ते येतात ....
मटका जिंकल्यागत
उर्मट
उद्धट
हावरट
झिंगलेल्या अविर्भावात
स्वत:च स्वत:चा
जयजयकार करत

ते येतात ...
दरडावत
गुरगरत
अहंचा दाबून आत
भरलेला वात
नाकामध्ये सोडत

अन जेंव्हा
परतात ..
तेव्हा
पावसात
भिजल्रेले कुत्रे
गेल्यावर उरतो
तसा असह्य दुर्गंध

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - मदांध