झुंजुरमास कथा

शटरबंद

Submitted by अमृतवल्ली on 1 March, 2015 - 23:34

मला एखाद्याचा राग आला ना की खूप राग येतो. उगाच नाही आई मला चिडका बिब्बा म्हणते. पण आता मला पेअर फाकार्द या माणसाचा इतका राग आलाय की इतका राग मला कोणाचाही येत नाही. राजूदादा म्हणतो प्रत्येक गोष्टीचे पहिले तीन नंबर काढून ठेवावे म्हणजे ठरवायला सोप्प जात. पण काय ठरवायला सोप्प जात ते नाही सांगितलय. भाव खाण्यामध्ये राजूदादा फार आहे अगदी. मी भावखावू लोकांमध्ये त्याचा नंबर पहिला ठेवलाय. तरी माझ्या तीन आवडत्या आज्या ठरल्यात आणि तीन माणस ज्यांचा मला खूप राग येतो ते. एक म्हणजे रमाकाकू. कारण तिला मला सोडून पुण्याला चालली आहे. कायमची. आणि तिने मला हे सांगितलं सुद्धा नाही स्वतःहून, दोन म्हणजे अण्णा.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - झुंजुरमास कथा