व्रुत्तबद्ध काव्य

प्रलय (मंदारमाला वृत्त)

Submitted by संतोष वाटपाडे on 26 January, 2015 - 23:21

आकाश पाताळ एकत्र व्हावे अशी वेळ यावी पुन्हा एकदा
काळोख व्हावा सभोवार तेव्हा दिसाया नको येथली संपदा..
ज्वालामुखी तप्त यावा असा कि धुरानेच व्यापून जावी धरा
निर्वंश होऊनिया जीवसृष्टी तुझे राज्य यावे पुन्हा ईश्वरा...

माणुसकी राहिली ना कुणाला दया प्रेम शांती कुठे लोपली
वाढायला लागली हिंस्त्रबुद्धी विनाशाकडे माणसे धावली..
झाले रिपू मित्र होते कधी जे स्वभावात खोटेपणा वाढला
धर्मांधतेने मनातील यांच्या जगातील गोतावळा तोडला...

वेताळ सैतान यांचीच पूजा इथे रोज देवाप्रमाणे सुरु
कोणापुढे हात जोडावयाचे कुणाची खरी प्रार्थना मी करु..
रस्त्यावरी खून होतात देवा बलात्कार झाले प्रथा येथली

Subscribe to RSS - व्रुत्तबद्ध काव्य