कारावास्

बिनशर्त कारावास

Submitted by संतोष वाटपाडे on 6 November, 2014 - 23:02

वेदना लपवून सार्‍या हसवतो ओठास हल्ली
मात्र खोटे हासण्याचा होत आहे त्रास हल्ली..

सोबतीला तू अता नसलीस कि आनंद होतो
मोकळे निघतात कंठातून सारे श्वास हल्ली..

रिक्त डोळ्यातून माझ्या वेदना बाहेर येते
आसवांना लाभतो बिनशर्त कारावास हल्ली..

प्राक्तनाने ओढलेली रेघ का ओलांडते तू
वेगळ्या वेशात रावण हिंडतो सर्रास हल्ली..

मुखवटे लावून दुनिया फ़सवते प्रत्येक वेळी
मी कुणावरती बरे ठेवायचा विश्वास हल्ली..

थांब कर्णा कुंडले देऊ नको आता कुणाला
ओळखीतूनच फ़सवणुक जन्मते हमखास हल्ली..

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - कारावास्