ववि २०१४

'तो' म्हणजे???????

Submitted by लाजो on 19 June, 2014 - 01:01

'तो' .....

'तो' म्हणजे... सळसळता उत्साह
'तो' म्हणजे... खळाळता प्रवाह

'तो' म्हणजे... गाण्यांचा पाऊस
'तो' म्हणजे... भिजण्याची हौस

'तो' म्हणजे... मस्तीचा झरा
'तो' म्हणजे... हास्याचा फवारा

'तो' म्हणजे... ढोलकीची थाप
'तो' म्हणजे... गटगंचा बाप

'तो' म्हणजे... मातीचा गंध
'तो' म्हणजे... नवे ऋणानुबंध

'तो' म्हणजे... वार्षिक पर्वणी
'तो' म्हणजे... सुखद आठवणी

'तो' परत येतोय...
सगळेच वाट बघतोय........ Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - ववि २०१४