रुद्राक्षी, अजानवृक्ष
Submitted by पुरंदरे शशांक on 12 May, 2014 - 07:05
काल सकाळी अचानक थोडे बाहेर जावे लागले. अंजूही बरोबर होती. सहाजिकच काही झाडे पहात चाललो होतो ...
कदंब आणि टेंभुर्णीची झाडे पाहिली - त्यांचे काही फोटोही काढले ....
मग एक वेगळेच झाड दिसले - अगदी बारीक पिवळी फुले लागलेली होती त्याला - त्याच्या फुलांचे, पानांचे फोटो काढेपर्यंत कॅमेर्यात "लो बॅटरी" सिग्नल यायला लागला - मग पुढे काही फोटो काढता आले नाहीत ......
तेवढ्यात एक " कीटक महाराज" दिसले ...... प्रेइंग मँटिसचा हा कात टाकल्यासारखा प्रकार काय आहे हे विचार करेपर्यंत अंजूने - "चल पहिले इथून"चा धोशा लावला ....
विषय:
शब्दखुणा: