प्राण्यांची मॅच
Submitted by विनार्च on 22 April, 2014 - 05:51
माझ्या लेकीने केलेली पहिली कविता.... मला खूप आवडली म्हणून इथे शेयर करतेय. तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा 
प्राण्यांची मॅच
प्राणी खेळू लागले क्रिकेट
फोर सिक्स आणि विकेट
माकडाने टाकली अशी काय गुगली
लगेच मांजरीची शेपूट फूगली
कोल्हा मोजत होता स्कोर
किती वे़ळ गेला झाला तो बोर
अस्वल बनलं होतं पंच
खूणांचे त्याच्याकडे संचच संच
कासव घेत होता रन
लगेच रन आऊट झाला तो पण
विषय:
शब्दखुणा: