गाढव्

लग्न

Submitted by संतोष वाटपाडे on 28 January, 2014 - 22:02

लग्न म्हणजे गाढवपणा हे खरे का,
ऐन वेळी घात होतो हे खरे का...

हिंडण्याचे बंद होते रात्र असता,
बायको धाकात घेते हे खरे का....

फ़ेसबुक सोडायचा आदेश येतो,
सिंह तेव्हा गाय होतो हे खरे का....

रोडवर चालायचे पण मान खाली,
या अटीवर खेळ सारा हे खरे का....

सुंदरी दिसताच डोळे झाकण्याची,
दुष्ट्बुद्धी येत जाते हे खरे का.....

गाढवी सुद्धा परी वाटून जाते,
बायको बेकार दिसते हे खरे का....

एकटे राहून मज्जा फ़ार होते,
लग्न होता डाव फ़सतो हे खरे का....

---- संतोष वाटपाडे (नाशिक)

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - गाढव्