मोईराङ

कोलकता ते मोईराङ - व्हाया जर्मनी आणि तोक्यो ( नेताजींच्या जयंतीनिमित्त)

Submitted by सावली on 23 January, 2014 - 00:14

१९ जानेवारी १९४१, कोलकत्यातल्या एका बंगाली घरातून एक पठाण कारमधून बाहेर पडला आणि मजल दरमजल करत थेट अफगणीस्तानात पोहोचला. तिथल्या मित्रांच्या मदतीने मूकबधिर असल्याने नाटक वठवत सोविएत रशियाच्या सरहदीजवळ पोचला. तिथून पुन्हा एकदा इटालियन माणसाचे वेषांतर करून मॉस्कोला पोचला. सोविएत रशिया कडून भारताच्या स्वातंत्र्यासाठी मदत होईल अशी अपेक्षा होती, ती फोल ठरल्यावर तो तरुण थेट जर्मनीला थडकला. त्याकाळात जेव्हा दळणवळणाची साधने फारशी उपलब्ध नव्हती, सतत पकडले जाण्याचा धोका होताच तरीही इतका मोठा प्रवास करण्याचे धारिष्ट्य आणि दूरदृष्टी ठेवणारे नेताजी सुभाषचंद्र बोस!

विषय: 
Subscribe to RSS - मोईराङ