अंधाराचा राजदूत मी

अंधाराचा राजदूत मी

Submitted by बेफ़िकीर on 11 December, 2013 - 02:39

मूक शिवालय, सळसळ पाने, वेडे पक्षी, एक प्रवासी
पिंडीवरती युग ओघळते गाभार्‍याची खोल उदासी
चिरंतनाच्या अस्तित्वावर क्षणभंगुरतेच्या कागाळ्या
निर्माल्याची ओल जगवते धर्माधर्मांच्या लाथाळ्या

काय हेलपाटा पडला हा, हे तर डोंगर दुरुन साजरे
अंधाराचा राजदूत मी, मी स्वीकारू तेज का बरे
शून्यामधल्या प्रसववेदना गूढ, निराकारी, बहुपदरी
इथले फेरे या हृदयाच्या निर्हेतुकश्या अफरातफरी

-'बेफिकीर'!

Subscribe to RSS - अंधाराचा राजदूत मी