क्रीडचन्द्र वृत्त : एक प्रयास :''एकलव्य ''

क्रीडचन्द्र वृत्त : एक प्रयास :''एकलव्य ''

Submitted by भारती.. on 15 November, 2013 - 11:04

क्रीडचन्द्र वृत्त : एक प्रयास
("लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा" )

‘’एकलव्य ‘’

मला वेढतो हा ऋतू जाणिवेच्या झळांचा हिमानी
जशी एकट्या एकलव्यास वेढे व्यवस्था पुराणी
गुरू मानले द्रोण आचार्य त्याने मनामानसात
निदिध्यास घेउन एकांत अभ्यास केला वनात

हिरावून घेईल हा श्रेय येथील प्रस्थापितांचे
गुरूनेच निर्दाळले स्वप्न भोळे किराताकुळीचे
तुटे अंगठा रक्त लोटे भळाळून मातीत लोळे
वरी ढाळती क्षार अश्रू अनिर्बंध निष्पाप डोळे

कथा एक वाहे नदीसारखी ती किती काळ गेला
नव्याने कितीदा निषादास त्या जन्म येथे मिळाला
कुणा सांगता गोष्ट तत्वभ्रमाची ? उरे हाच शोक

Subscribe to RSS - क्रीडचन्द्र वृत्त : एक प्रयास :''एकलव्य ''