रागवली थोडीशीच एक परी राणी..

रागवली थोडीशीच एक परी राणी.

Submitted by गणेश पावले on 23 October, 2013 - 04:33

रागवली थोडीशीच
एक परी राणी........
आठवणीत तिच्या कधी
येत डोळा पाणी........
खूप खूप बोलायची
हसवयाची मला............
कोड्यामध्ये टाकून कधी
फसवायची मला......
वेडावून कधी कधी
तोंड वाकड करी.....
मधेच रुसून सारा
मूड ऑफ करी...........
दोन दिवस झाले माझ्याशी
बोलतच नाही....
चुकल वाकल माझं तर
काही सांगतच नाही...
काय करावं काहीच
सुचेना हो मला.....
तिच्यावाचून आज कसं
करमेना मला....
रागावली थोडीशीच
एक परी राणी........
आठवणीत तिच्या कधी
येत डोळा पाणी........

Subscribe to RSS - रागवली थोडीशीच  एक परी राणी..