तुझ्या मिठीत...

तुझ्या मिठीत...

Submitted by राजेंद्र देवी on 19 October, 2019 - 01:04

तुझ्या मिठीत...

तुझ्याच मिठीत माझे जग सारे
तुझ्याच डोळ्यात पाहते चंद्र तारे
उचंबळुनी येती या लाटा प्रीतीच्या
तुझ्याच भोवती हे अवखळ किनारे

तुझ्या स्पंदनात विसावले जग सारे
नको आयुष्यात काही फापटपसारे
मिसळून श्वासात श्वास तुझ्या
विसरुनी जाते गंध फुलांचा रे

तुझ्या मिठीत विसावता, घोंगावते वादळवारे
विसरुनी जाते जगास, शांत होती निखारे
आठवणींनी नुसत्या फुटती धुमारे
अवचित प्रीतीची वेल हि बहरे

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 

तुझ्या मिठीत...

Submitted by राजेंद्र देवी on 19 October, 2013 - 07:00

तुझ्या मिठीत...

तुझ्याच मिठीत माझे जग सारे
तुझ्याच डोळ्यात पाहते चंद्र तारे
उचंबळुनी येती या लाटा प्रीतीच्या
तुझ्याच भोवती हे अवखळ किनारे

तुझ्या स्पंदनात विसावले जग सारे
नको आयुष्यात काही फापटपसारे
मिसळून श्वासात श्वास तुझ्या
विसरुनी जाते गंध फुलांचा रे

तुझ्या मिठीत विसावता, घोंगावते वादळवारे
विसरुनी जाते जगास, शांत होती निखारे
आठवणींनी नुसत्या फुटती धुमारे
अवचित प्रीतीची वेल हि बहरे

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - तुझ्या मिठीत...