मंदारमाला : एक प्रयास भारती बिर्जे डिग्गीकर

मंदारमाला : एक प्रयास

Submitted by भारती.. on 25 September, 2013 - 02:47

मंदारमाला : एक प्रयास

(गागाल गागाल गागाल गागाल गागाल गागाल गागाल गा ,अक्षरे २२ , अनिश्चित यती ४,१०,१६,२१
वृत्तलक्षण - साता त-कारीच मंदारमाला गुरू एक त्याच्याहि अंती असे )

येथे दिसे की सुखाच्या मिषाने झळाळे भ्रमाचीच रंगावली
जी रोषणाई दिसे घाटमाथ्यास ती काजव्यांचीच दीपावली

आघात नी घात उत्पात हे नित्य वृत्तात चित्तात घोटाळती
संवेदनांचे मृत:प्राय तंतू कसे जाणिवेलाच वेटाळती

आक्रंदुनी जात निद्रेत अस्तित्व माझी मला मी न ये ओळखू
बाजार आवार हे एक झाले निके सत्व येथे कसे पारखू

मी विस्मरावी कुरूपे जगाची ढिगार्‍यात मेंदूत जी साचली

Subscribe to RSS - मंदारमाला : एक प्रयास  भारती बिर्जे डिग्गीकर