मीलन

मीलन

Submitted by उमेश वैद्य on 13 July, 2013 - 02:47

येता अचानक नभी जलधी भरून
नाचे मनी मयुरही पर पिंजरून
पेटून लख्ख उमटे क्षितिजात रेघ
विद्युल्लता चमकती उजळे परीघ
येईल आज गगनी वरण्या प्रियेस
पाऊस चिंब भिजवेल वसुंधरेस

एका ढगास दुसरे ढग श्यामलांग
घासीत जात पुढती फुलवी अनंग
बोले दिशांस धरणी बघतोय अंत
आला नसे अजुनही मम चित्तकांत
आरक्त रंग नयनी अभिसारिकेस
पाऊस चिंब भिजवेल वसुंधरेस

मातीस धुंद सुटला मधुगंध फार
अंगात रोम कलिका फुलवी तुषार
ज्वालेस तप्त शमवी धरि धार पाश
पृथ्वी भरे विरहिणी जळ सावकाश
झोकून देह भुलुनी पडता भरीस
पाऊस चिंब भिजवेल वसुंधरेस

त्याच्या मिठीत अडके धरती तृषार्त
वारा सुमांस उधळे तव मीलनार्थ

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - मीलन