आजोबांच्या भेटीस ...... Trek to Ajobagad / Aja Parvat
Submitted by वेडसह्याद्रीचे on 2 July, 2013 - 04:17

हिरवे हिरवे गार गालिचे ,
हरित तृणाच्या मखमालीचे .
पावसाळ्यात कुठे हि ट्रेक ला जा ,सह्याद्रीच्या कड्या कपारयातून फिरा, बाल कवीं त्र्यंबक बापूजी ठोंबरे ह्यांच्या ह्या पंक्ती हमखास मुखी नाचू लागतात , आनंदाच्या स्वर लहरी मध्ये .., संगीताचे वलय निर्माण करून ..
हा निसर्ग अगदी भुलवून टाकतो आपल्याला , त्याच्या लावण्यमय सौंदर्याने ..., पण कधी कधी त्याच सौंदर्याला मानवी रूपाच एक डाग लागत . ती खंत मनास वाटू लागते . त्याचच वाईट वाटत खूप.
विषय: