आकाशमोगरा
Submitted by उमेश वैद्य on 13 April, 2013 - 03:37
आकाशमोगरा
आकाशमोगर्याची फुलली असंख्य पुष्पे
व्योमातही तशीच.. असतील अनन्त विश्वे
एकेक फूल त्याचे तारे असंख्य झाले
रात्रीस जे फुलोनी धरतीवरी गळाले
पडले गळून जेंव्हा मातीस ही सुगंध
दुस-यास देत गेले उरले जरी कबंध
प्रगतास का असावा दातृत्व हा अभाव
त्याच्यावरी पडेना याचा कधी प्रभाव
येथून एक जाता काही दुज्यास देतो
मनुष्य मात्र याला अपवाद काय ठरतो
विषय: