पावसावाचून गेले (संकेत तरही)
Submitted by बेफ़िकीर on 23 February, 2013 - 07:07
या उपक्रमानुसार रचलेल्या संकेत तरहीत माझा यथाशक्ती सहभाग. धाग्यासाठी डॉ. कैलास गायकवाड यांचे आभार!
-'बेफिकीर'!
==========================
पावसावाचून गेले पीक... म्हणणे ठीक होते
दु:ख हे की व्हायचे मातीसही नापीक होते
माणसाने शेत हालवले जरी सोयीप्रमाणे
पाखरे जमतात पूर्वी ज्या ठिकाणी पीक होते
श्रावणोत्सव पाहुनी ते गुंगले कामात अपुल्या
रूप नसलेल्या ऋतूंचे मन किती लवचीक होते
फक्त त्या झाडात दिसते लागलेली आग आता
क्षणभरापुरतेच वणवे काल सार्वत्रीक होते
विषय:
शब्दखुणा: