कातळ घाट वनिता -३

कातळ घाट

Submitted by वनिता तेंडुलकर ... on 4 February, 2013 - 06:55

कातळ घाट
गहाळ वाट
काळोखी छाया
काजळ माया

काजळ माया
कंपित काया
गच्च आभाळ
विजांचा जाळ

विजांचा जाळ
ढग नाठाळ
वारा मुजोर
धारांना जोर

धारांना जोर
जीवाला घोर
वादळापरी
बेताल सरी

बेताल सरी
समोर दरी
लुप्त तमात
रात्र भरात

रात्र भरात
भीती उरांत
हातात हात
तुझीच साथ
फक्त तुझीच साथ

वनिता....

Subscribe to RSS - कातळ घाट वनिता -३