अॅम्स्टरडॅमला भेट - ३ दिवस
Submitted by रेव्यु on 16 January, 2013 - 12:15
मी १६ एप्रिल १३ ला सकाळी ९ वा अॅमस्टरडॅमला पोहोचत आहे. ३ दिवस मोकळा आहे.
१९ एप्रिलला सकाळी ९ वाजता पुढील विमान आहे.
या कालावधीत काय काय पहाता येईल? तसेच जवळपास- बेल्जियम वगैरेला जाता येईल का? केवळ पर्यटन या दृष्टीने सांगाल का?
कंडक्टेड टूर्स चालतील.
मी या पूर्वी मदुराडॅम ( की मज्युरा डॅम??) व कुकेन्हॉफ पाहिले आहे. म्युजियम्स व नाईट लाईफ मध्ये स्वारस्य फारसे नाही. निसर्गसौंदर्य तसेच इतिहास, ग्रामीण भाग पहायला आवडेल.
हॉटेल मध्यवस्तीत बूक्ड आहे.
धन्यवाद
विषय:
शब्दखुणा: