मायनी

'मायनी' माई मुंडेरपे तेरी बोल रहा है कागा..

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

फार फार फार्फारचफार पूर्वी एक मायन आटपाट नगर होतं. तिथे एक मायन राजा होता. त्याला एक राणी (मायना[१]) व मायनी[२] नावाची मुलगी होती. मायनी जन्माला येण्याअगोदर कालगणना अस्तित्वात नव्हती. पण मायनी जन्माला आल्यावर तिचा सोळावा वाढदिवस (तेव्हाही सोळाव्या वरसाला फारचफार महत्त्व होते!) नक्की कधी करायचा, असा गहन प्रश्न पडल्याने राजाने लगेचच कॅलेंडर तयार करण्याचा निर्णय घेतला.[३] या प्रोजेक्टसाठी आधी स्थानिक लोकांकडून अर्ज मागवण्यात आले पण ते सगळे क्यांडिडेट इंटरव्ह्यूत फेल गेले. मग शेजारच्या राज्यातून एम१(मायन१) व्हिशावर (कमी पैशात) एकास घेण्यात आले.

विषय: 
प्रकार: 
Subscribe to RSS - मायनी