जेव्हा मायाळू कविता बंड करून उठते...

काव्य

Submitted by मिली२०१२ on 5 December, 2012 - 00:08

लेखणीच्या हृदयात दाटला वेदनाजर्जर उमाळा,
मरुत रुतली खोलखोल ही गरीब जीवनछाया.

पृष्ठावर उतरणारी शाई माघारली आज,
अग्रातून वेदना ठिबकते लेवून अश्रूंचा साज.

स्निग्ध ओल्या भावनांतूनही निघती तप्त ज्वाळा,
ऐरणीच्या रुपात उडवती आशेच्या लक्ष ठिकऱ्या.

गरीब शब्दही खवळून उठले झुगारून मग तमा,
सहस्त्राक्ष होऊनी ओकती विखारी विषारी जिव्हा.

Subscribe to RSS - जेव्हा मायाळू कविता बंड करून उठते...