दिवली ग सईबाई ...

दिवली ग सईबाई ...

Submitted by कमलाकर देसले on 29 November, 2012 - 10:31

दिवली ग सईबाई ...

दिवली ग सईबाई ,तुझी कोनाड्यात जागा ;
तुझं भकास आयुष्य ,कसं जळे भगभगा ..

नटण्याचा थटण्याचा , सोस हरवला कसा ;
चिंधी वातीच्या जागेला , तरी प्रकाशाचा वसा ..

उजळविते घराला , सुख सोज्वळ देवून ;
काळं कुट्ट तुझं दु:ख , येतं काजळी होवून ..

तुझ्या वाट्याला ग कुठं , वाडा काचेचा सुंदर ;
तुला वेगळालं कुठे , घर,स्मशान,मंदिर ..

वारा उघड्यावरचा , तेल सरता सरता ;
तुझ्या मरणाच्या फक्त , दोन आहेत श्यक्यता
..
दिवली ग सईबाई ,तुझी कोनाड्यात जागा ;

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - दिवली ग सईबाई ...