दाटते आहे निराशा फार हल्ली (तरही)

दाटते आहे निराशा फार हल्ली (तरही)

Submitted by बेफ़िकीर on 15 November, 2012 - 02:35

यावेळीच्या तरही मिसर्‍यासाठी डॉक्टरांचे आभार! माझा प्रयत्न येथे प्रकाशित करत आहे.
=========

आसवांची खिन्न संततधार हल्ली
दाटते आहे निराशा फार हल्ली

एकही उघडे दिसेना दार हल्ली
फक्त नावाला असे शेजार हल्ली

मी कसा ते फक्त मी पाहू शकावे
एवढा पडतो कुठे अंधार हल्ली

सोडल्यापासून तगडी नोकरी मी
वाटते येऊ नये रविवार हल्ली

संपली होती जणू नवजात कविता
मी पुन्हा रोगामुळे गर्भार हल्ली

-'बेफिकीर'!

Subscribe to RSS - दाटते आहे निराशा फार हल्ली (तरही)