रावसाहेब जाधव प्लेटफार्मच्या अगदी शेवटच्या टोकाला एका बाकळ्यावर बसला

रावसाहेब

Submitted by शाबुत on 13 October, 2012 - 11:39

निर्धार

रावसाहेब जाधव प्लेटफार्मच्या अगदी शेवटच्या टोकाला एका बाकळ्यावर बसला होता. आजुबाजुला कोणीही नव्हतं, एवढ्या लांब दुपारच्या तापत्या उन्हात कोणी येईलच कशाला? त्याच्या अंगावरुन घामाच्या धारा निथळत होत्या, कारण उन्हं अंगाला चटके देत होतं, तरी रावसाहेबाला आता कशाचीही पर्वा वाटत नव्हती.

तो एकटक दुरवर, हरवल्यासारखा पाहत होता. आपल्याच विचाराच्या तंद्रीत त्याला जगाचा विसर पडला होता. समोरच्या रुळावरुन गाड्या जोराचा आवाज करत येत-जात होत्या, त्यानं सारा प्लेटफार्म हलत होता, पण आता रावसाहेबाच्या मनात कसलीही धडधड होत नव्हती.

Subscribe to RSS - रावसाहेब जाधव प्लेटफार्मच्या अगदी शेवटच्या टोकाला एका बाकळ्यावर बसला