देव्हार्यात बसून तो ठरवतो की मी जगावे कसे - तरही
Submitted by सचिन गोरे on 25 September, 2012 - 08:48
देव्हार्यात बसून तो ठरवतो की मी जगावे कसे
कालाधीन मला न हक्क कुठला की मी मरावे कसे
नौका आज इथे उद्या पलिकडे पर्वा कशाला हवी?
होकायंत्र असून ना समजले की मी तरावे कसे
केसांचा तव स्पर्श आज घडता आयुष्य हे संपले
नागांनी तुझियाकडून शिकणे त्यांनी डसावे कसे
ओठातील मधाळ हास्य टिपता माझा न मी राहिलो
कमळातील किड्यास हे न उमगे की मी सुटावे कसे
दगडांच्या चरणी कुजून मरणे प्राक्तन फुलांचे असे
झेंडूचा बाजार रोज भरता चाफे फुलावे कसे
काळाचे शार्दूलरूप दिसता भांबावला जीव हा
शेळीने कुरणात कोठल्यापण सांगा चरावे कसे
विषय: