ही कुणाची सावली माझ्याबरोबर चालते

ही कुणाची सावली माझ्याबरोबर चालते? तरही

Submitted by शेळी on 3 August, 2012 - 09:07

प्रेरणा : http://www.maayboli.com/node/36911

ही कुणाची सावली माझ्याबरोबर चालते
व्यर्थ पदरव का तिचे माझ्याबरोबर वाजते

आरशातिल पाहतो प्रतिबिंब माझे हासरे
ते ललाटी भाग्य का माझ्याबरोबर वाचते

मूक स्वरगंगा पहाते हृदय माझे भंगता
भडकुनी दु:खात ती माझ्याबरोबर भाजते

ती मला अन मी तिला बसलो पहातच एकटक
गोड तीही हासुनी माझ्याबरोबर लाजते

मेघ माला दाटल्या काळोख काळा पसरला
पावसाचे साम मग माझ्याबरोबर नाचते

हुश्श.. झाली एकदाची.

गुर्जी फेपर तपासा.

Subscribe to RSS - ही कुणाची सावली माझ्याबरोबर चालते