ती संपली कहाणी

ती संपली कहाणी

Submitted by जयन्ता५२ on 14 July, 2012 - 10:33

ती संपली कहाणी
शोधू नको निशाणी

घडले नवे न काही
अन् कारणे पुराणी

माझ्या सवेच झाली
ही आसवे शहाणी

मी शीळ घालतो, ती
का भासते विराणी?

राजा नसेन मी, पण
गोष्टीत तूच राणी!

-------जयन्ता५२

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - ती संपली कहाणी