धूम्र वलय

धूम्र वलय

Submitted by संजयb on 10 July, 2012 - 02:37

मन माझे वेध घेई
तूझ्या आठवांचा
परी सापडेना ठेवा
प्रितीच्या क्षणांचा

मन:पटला वरी आता
तू अंधूकशी पाठमोरी
तूझ्या वदनाच्या रेखा
कधीच लोपल्या पूसल्या

तरी एक वेदना
सूर होवूनी उदास
मनात फिरते
अंधूक अंधूक
एक धूम्र वलय

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - धूम्र वलय