हर्ब मासा

Submitted by मनःस्विनी on 3 August, 2009 - 16:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

herb-halibut.jpg

----------------------------------------------------------------------------------
१ मोठा तुकडा halibut/catfish,(हे मासे पटकन तुटत नाहीत तसे.),
fresh रोसमरी, थाईम, कोथींबीर,
आवडेल तेवढी लसूण ठेचलेली,
एखाद दुसरी शिळी ब्रॉउन ब्रेडची स्लाईस,
सीसॉल्ट,
लिंबाची व संत्र्याची ग्रेटेड साल,
४ चमचे लिंबू,अननस व संत्र्याचा ताजा रस,
२ चमचे कनोला ऑइल,
१/२ चमचा smart balance organic spread,

क्रमवार पाककृती: 

halibut नीट धूवून निथळून घेतला की पेपर टोवेल वर कोरडा करायचा. आधी किंचीत हळद लावून घ्यायची. एका बोल मध्ये लिंबाचा, अननसाचा व संत्र्याचा ताजा रस काढून त्यातच साल किसायाची (आधी सालं किसून मग रस काढला तर बरा). मग त्यातच तेल ,लसूण ,मिठ टाकून मस्त घुसळून एकजीव करायचे. ह्या मिश्रणात मासा बुडवून ठेवून द्यायचा एक तास. आता ब्रेडची स्लाईस मिक्सीतून फिरवून घ्यायची. त्यात परत उरलेली एखादी लसणाची पाकळे,रोसमरी, थाईम्,कोथींबीर टाकून फिरवून क्रम्स तयार करायचे. मासा एक तासाने मस्त मूरल्यावर काढायचा. पाणी ठिबकून काढायचा.
तू ह्या क्रम्स मध्ये घोळवून घ्यायचा. त्यावर लेमन कट्स ठेवून द्यायचे. फॉइलचे पॉकेट्स बनवायचे. एखादे भोक पाडायचे. हे पाकीट ग्रिलवर नाहीतर ओवन मध्ये २० मिनीटे आधी पुर्ण बंद मग ५ मिनीटे जरा उघडे ठेवून भाजायचे.
ग्रिल साठी: फक्त १५ मिनीटे मस्त भाजून मग उघडे ठेवून थोडेसे वेज स्प्रेड टाकायचे.
ओवन साठी: ओवन १५ मिनीटे आधी ४५० वर मस्त तापवून घ्यायचा. मासा आत ठेवून २० मिनीटे झाली की मग पॉकेट उघडायचे. वरती थोडे वेज स्प्रेड टाकून मग ओवन ब्रॉइल वर ठेवायचा ४०० डिग्री करून. ते क्रम्स मस्त लालसर होतात. मासा मस्त फ्लेकी होतो. ड्राय होत नाही पॉकेट करून ठेवल्याने. मस्त हर्बचा वास येतो.

अधिक टिपा: 

halibut मध्ये बर्‍यापैकी मर्कुरी असते तेव्हा कधीतरी खाणे बरे. पण ग्रिल साठी मला हा मासा मस्त वाटतो. चवीला मस्त लागतो. मस्त स्टीम्ड ब्रोकोली व सॅलड बरोबर मस्त लागतो. डोक्याला ज्यास्त त्रास नाही. भांडी नाही काही नाही. Happy

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो सॅमन वापरून सुद्धा होइल. पण सॅमन जरा उग्र वासाचा असतो तेव्हा जरा ज्यास्त वेळ मूरवलास तर आणखी छान. Happy तरी लिंबू अननस नी संत्र आहेच तसे. तेव्हा बघ नी सांग. मी सॅमन जरा वेगळा मसाला लावून करते.

मी सॅमन जरा वेगळा मसाला लावून करते.>>
तो कसा ते हि जमल्यास सांग ग मग. आमच्याकडे सॅलमन खुप खाल्ला जातो त्यामुळे ती हि कृती करुन बघायला आवडेल Happy

मी सुद्धा आत्ताच हा प्रकार करून खाल्ला . Happy फरक इतकाच की मी ब्रेड क्रम्ब्स मध्ये मॅरिनेशनसाठी वापरलेला संत्रं , लिंबू , अननस ज्यूस घालून ते सॅलमनला बाहेरून लावले . मस्त चव आली होती . मनू , थँक्स . हा फोटो तुझ्यासाठी .

Salmon.jpg

धन्यवाद आपुलकीने कळवल्याबद्दल. Happy
मस्त दिसतोय मासा. क्रम्सचा थर पातळ न लावता सॅमन होतो ना?
मी कधी सॅमनला क्रम्स लावत नाही कारण तो जाड मांसल मासा आहे. (हो आता आठवले तू विचारलेला मसाला, सॉरी लिहायला विसरले). बरे झाले तू करून सांगितलेस मी करते आता तसा.....

थर जाड लावून सुद्धा सॅलमन मस्त शिजतो . आत्ताचाच अनुभव आहे . तू सांगितल्याप्रमाणेच २० मि फॉईलमध्ये गुंडाळून आणि मग ५ मि फॉईल काढून ठेवला होता . वरून क्रिस्पी आणि आतून मस्त सॉफ्ट झाला होता . माझा सॅलमन सहसा ड्राय होतो , पण आजचा अजिबात तसा नव्हता . Happy

भारीच..!!
आधी सालं किसून मग रस काढला तर बरा>> Biggrin

तोंपासु.

<<
smart balance organic spread,
<<

याची रेस्पी द्या.

मासू खात नाही पण मनःस्विनीचे नाव वाचून धागा उघडला.
वेलकम बॅक.
खूप दिवसांनी दिसलीस. छान वाटले. Happy
oops
मला वाटलं मन:स्विनी आली परत.