झुळूक

Submitted by webmaster on 7 January, 2008 - 01:31

हि जागा चारोळी लेखनासाठी. कृपया आपल्या चारोळ्या इथेच प्रतिसादामध्ये लिहा.

गुलमोहर: 

तु म्हणतोस तुझं मन
लागत नाही तिकडं पण
मी कधी म्हटलं तुला
येउ नकोस इकडं ?

जSरा बाजूला बघावं फांदीनं;
सांग तू एकटी कशी?
शेजारणीच्या मुळाशी जाता
जुळून येतिल नाति अशी

मायबोलीकरान्नो,
नमस्कार.

माझ्या अतिशय लाड्क्या मित्राच्या अरधान्गिनिची चिता पेटविताना त्याच्या ७ वर्श्याच्या मुलीचे तीच्या ४ वर्श्याच्या भावासहित झालेली अवस्था जसे भावनाना शब्द मिळाले तसे मान्डित आहे

शान्त झाल दाह आणि चिता रचली,
देह झाला मुका विरली चैतन्य शक्ति!
काय झाले माउलीला काही लॅ़कराला कळेना,
चटका बसेल आईला पिलु ओरडले पुन्हा!
एकटीच माझी आई अशी कुठे अन का चालली,
आज नाही हट्ट मीग करणार कशासाठी!
कुशी मधे मज आज काग घेत नाही आई?
पुन्हा कशासाठी कधी हट्ट मीग करणार नाही!
तुझी शपथ ग आई, आपल्याग दादाची मी खोटी होइन मी आई,
फक्त...एकदा तु मज आज मिठीमधे घेइ!
अग खरी जगरीत मला कळतच नाही,
माझ्या लग्ना आधीच तुला कसली ही घाई!
लपछपीच्या खेळात तु दिले राज्य माझ्यावरी,
अशी कशी लपलीस तु सुद्धा ग देवाघरी!
नेहमीच जिकण्यात माझ्या, तुझी मात्र हार होई,
आज हारले मी आई, तुझे राज्य तुला घेई!

सुमा (उमेश पवार)

व्वा! एकाहून एक झुळूक आहेत.

उमेश...(सुमा)
तुझि हि कविता ...हा प्रसंग्...आणि डोळ्यातले पाणि...
दिर्घ काळ मन सुन्न करित राहिल.....

सुमा, डोळ्यांतुन पाणी आल. कुणा लहानावर असा प्रसंग येऊ नये.

मनोहर
नजरेत जे सामर्थ्य आहे
तितकेच शब्दांत आआसवे
नाहि तर प्रेम हे तुम्हाला
कसे कळणार

नमस्ते मित्र-मैत्रिणिनो
छान धमाल करत आहात... असेच येऊ द्या...
उमेश अप्रतिम लिहिता...

आभाळाच्या निळाईचे
कौतुक मजला नाहि
झुळुकेच्या या धरेवर
शब्द आभाळ होवुन राहि

प्रिति

असेच लिहित रहा...

मन असं का? भवर्यासारखं.
गर्र भिरणारं पण जागिचं,
खोल जावुन स्थिर होणारं,
अन् थकुन लगेच मतीत रोळ्णारं........

निरोप घेतांना संपल्यासारखे वाटले,
वर्षांचे अश्रु डोळ्यांत दाटले,
सोडतांना घरटे,
आयुष्य संपल्याचे वाटले.

जोशी...धन्यवाद.
पोतिकर्...भावना पोहोचल्या...आणि नोकरी निमित्त घर सोडताना अनुभवल देखिल...वाचताना तेच डोळ्यासमोर उभे राहीले...अप्रतिम.

खरा खरा
ज्याच्या कडे नाही तो ...सैरा वैरा
ज्याच्या कडे आहे तो ...हैरा हैरा
ज्याच्या कडे असुनही नाही तो ...वैरा वैरा
ज्याच्या कडे नसुनही आहे तो ...बरा बरा
ज्याला कळल असण आणि नसण तो ...खरा खरा

सुमा

पोतिकर.. छान लिहिता...
मनाच हे असच असत
आभाळासारख विशाल अन
सागरासारख खोल असत
गुंतता ते कोणात
आपले ते कधिच नसत...
प्रिति

जब्बरदस्त बापू!

  1. तुला आकाशातील सूर्य दिसावा
  2. मला दोन सूर्यांत आकाश दिसावे!!

मस्त...

जन्मा आले तेव्हापासुन
मादीपणाचा शिक्का लागला
वेगवेगळ्या गर्दीमध्ये
माझ्या मनाला धक्का लागला....

seriously.... मस्तच!

फरच छान मित्रा
हदयाला लागल काहितरि.

मनाला लागले रे

कळी उमलन्याच स्वप्न पाहत
वेडा चद्र रात्रभर जागत होता
कळी उमलनारच असा त्याचा विश्वास होता
सकाळ झली कळी उमलली
पण पहायला च॑द्र कुथे होता.......

अतिशय सुंदर

धावता धावता स्वप्नामागे
थकलो कधिच मी नाही
स्वप्नामधुन जेव्हा तुच दिसेनशी झालीस
माझ्या धावण्याला प्रेरणाच ती उरली नाही.

shwas_0.gif

छान आहेत झुळुका... असेच येऊ द्या

"दवबि॑दू" ची चारोळी फारच आवडली

मी तुला पाहिल होत
माझ्याकडे पहाताना......
अन माझ्याकडे पाहून सुदधा
न पाहिल्यासारख करताना....

eye.gif

चारोळी म्हणजे
ओळी असतात चार
तुमच्या आणी माझ्यातल्
सांगून जातात सारचं

वाचुन झाला आनंद मोठा
वाचुन आनंदविभोर मी झालो
नाचतनाचत गात सुटलो
पाहुनी मी तिला थांबलो

eye.gif

Pages